चिंचवडमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानतर्फे’नवदुर्गा’चा सन्मान
![Honoring 'Navadurga' by Shri Swami Samarth Seva Pratishthan in Chinchwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-06-at-3.00.47-PM-780x470.jpeg)
पिंपरी : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी नवरात्री मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांना “नवदुर्गा पुरस्कार “ने सन्मानित करण्यात येते. या वर्षी देखील हा कार्यक्रम नवमी च्या दिवशी घेण्यात आला. शिवतेज नगर, पूर्णा नगर, शाहूनगर, व संभाजी नगर मधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांना “नवदुर्गा पुरस्कार २०२२ “ने सन्मानित करण्यात आले.. सदरचा सन्मान हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट व डॉ. अंजली आवटे यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी प्रवचकार धनश्री ताई महामुलकर उपस्थित होत्या.. संस्थापक अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी प्रास्ताविका मध्ये पुरस्कार विषयी माहिती दिली.. डॉ. अंजली आवटे यांनी सामाजिक काम करीत असताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी… प्रा. कविता आल्हाट म्हणाल्या कि सामाजिक कार्य करणाऱ्या महिला च्या पाठीशी समाजानं उभे राहिलं पाहिजे.. धनश्री ताई ने समाजासाठी काम करणाऱ्या महिलांनी देव, देवतांची उपासना करावी, ध्यान करावे असे सांगितलं.. नवदुर्गा च्या मानकरी, यांना मनाचे फेटे बांधून सन्मानित करण्यात आले…सौ. पुष्पा बोत्रे (सामाजिक )ज्योती जाधव (पर्यावरण )विजया रोडे (वैदकीय )संगीता जोशी (विकलांग )माधुरी कटारिया (अन्नदान )मनीषा गायकवाड (पोलीस )रजनी बागुल (एड्स जनजागृती )शलाका कोंडावर (सामाजिक )कू. पूनम चाचर (प्राणी )तसेच दोन विशेष सन्मान, कू. धनश्री ताई महामुलकर (आधात्मिक )सौ. मनीषा देव (धार्मिक )यांचा करण्यात आला.या प्रसंगी प्रा. हरीनारायण शेळके, ज्योती गोफणे, सारिका पवार, अंजुषा नेर्लेकर, राजु गुणवंत, अर्चना तोंदकर,अंजली देव तसेचमोठया प्रमाणावर स्वामी सेवेकरी उपस्थित होते.. कार्यकामाचे सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. हरीनारायण शेळके यांनी केले.