एसएनबीपी अकॅडमीकडून हॉकी सोलापूर पराभूत
![Hockey Solapur defeated by SNBP Academy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-13T163537.282.jpg)
पिंपरी चिंचवड | एसएनबीपी अकॅडमीने हॉकी सोलापूर तर खेलो इंडिया सेंटर, कोल्हापूर संघाने पुणे इलेव्हन संघाचा पेनेल्टी शूट आऊटमध्ये पराभूत करून 3 ऱ्या एसएनबीपी राज्यस्तरीय महिला हॉकी स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला.एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने चिखली येथील डॉ. दशरथ भोसले हॉकी स्टेडियमच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत एसएनबीपी अकॅडमी संघाने हॉकी सोलापूर संघाचा 2-1 गोलने पराभव केला. विजयी एसएनबीपी संघाकडून जीया सिंगने 22 व्या आणि प्रगती झोडगेने 36 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. पराभूत हॉकी सोलापूर संघाचा एकमेव गोल दुर्गा शिंदेने 10 व्या मिनिटाला केला.
दुसऱ्या लढतीत कोल्हापूरच्या खेलो इंडिया सेंटर संघाने पेनेल्टी शूट आऊटमध्ये पुणे इलेव्हनला 5-3 गोलने नमविले. दरम्यान, पूर्ण वेळेत हा सामना 1-1 गोल बरोबरी संपला. यावेळी पुणे इलेव्हन संघाच्या दुर्गा शिंदेने 10 व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळून दिली. त्यानंतर 27 व्या मिनिटाला खेलो इंडिया सेंटरच्या कृष्णा मानेने गोल करून बरोबरी साधली आणि पूर्ण वेळेत सामना बरोबरीत संपला.
पेनेल्टी शूट आऊटमध्ये खेलो इंडिया सेंटरकडून पूनम गावडे, स्नेहाली पाटील, तेजस्वीनी खराडे, सानिका माने या खेळाडूंनी गोल केले. त्यांची कृष्णा माने गोेल करू शकली नाही. पुणे इलेव्हन संघाकडून समृद्धी झुजाम व दीक्षा अवघडे या दोनच खेळाडू गोल करू शकल्या. संघातील प्राजक्ता माने व दुर्गा शिंदे गोल करण्यात अपयशी ठरल्या.
निकाल –
एसएनबीपी : 2 गोल (जीया सिंग 22 व्या. मि. -1 गो., प्रगती झेडगे 36 व्या. मि. -1 गो.) वि. वि. सोलापूर : 1 गोल (संतोषी गाडेकर 37 व्या मि.- 1 गो.)
खेलो इंडिया सेंटर, कोल्हापूर : 1 गोल (कृष्णा माने 27 व्या. मि. – 1 गो.) विरूध्द पुणे इलेव्हन : 1 गोल (दुर्गा शिंदे 10 व्या. मि. 1 गो.), पेनेल्टी शूट आऊट : खेलो इंडिया सेंटर, कोल्हापूर : 4 गोल (पूनम गावडे, स्नेहाली पाटील, तेजस्वीनी खराडे, सानिका माने या खेळाडूंनी गोल केले. त्यांची कृष्णा माने गोेल करू शकली नाही) पुणे इलेव्हन : 2 गोल (समृद्धी झुजाम व दीक्षा अवघडे या दोन खेळाडू गोल करू शकल्या. त्यांया प्राजक्ता माने व दुर्गा शिंदे गोल करण्यात अपयशी ठरल्या).
महाराष्ट्र इलेव्हन : 8 गोल (सुकन्या ढावरे 10, 12, 22 व 38 व्या मि.- 4 गोल, मनश्री शेडगे 17 व 40 व्या मि. – 2 गो., उत्कर्षा काळे (21 व्या मि. – 1 गो., किर्ती ढेपे 39 व्या. मि. – 1 गो.) ,वि. वि. सातारा : शून्य गोल;
नाशिक अकॅडमी : 4 गोल (साक्षी पगार 21 व्या. – 1 गो., सांची गांगुर्डे 25 व्या. -1 गो., दिपाली पाटील 27 व्या मि. -1 गो., नाझिया के. खान 32 व्या. मि.-1 गो.) वि. वि. जळगांव : शून्य गोल.