सोशल मिडीयावर ओळख करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/minor-girl.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
सोशल मिडीयावर ओळख करून अल्पवयीन मुलीला मोठ्या हॉटेल आणि कारचे फोटो दाखवून प्रभावित केले. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिला व तिच्या वडिलांना मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत गैरवर्तन केले. ही घटना फेब्रुवारी 2021 ते 21 मार्च 2022 या कालावधीत रहाटणी व पिंपळे सौदागर येथे घडली.
पिडीत मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 17 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीसोबत आरोपीने सोशल मिडीयावरून ओळख केली. त्यानंतर मुलीला मोठमोठ्या हॉटेल आणि कारचे फोटो दाखवून प्रभावित केले. मुलीसोबत जवळीक साधून तिला भेटण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला. तिला व तिच्या वडिलांना मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत मुलाने गैरवर्तन केले. त्यानंतर या प्रकरणाचा व्हिडीओ बनवला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.