पिंपरी-चिंचवडचे दिवंगत महापौर भिकू वाघेरे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
ह.भ.प नितीन महाराज मोरे यांना आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार

पिंपरी | दिवंगत महापौर कै.भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी वाघेरे गाव येथील कै. भिकु वाघेरे-पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त मा. श्री. उल्हास जगताप, माजी विरोधी पक्ष नेते मा. विठ्ठल उर्फ नाना काटे व काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आला. सालाबादप्रमाणे कै. भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार देहू संस्थानचे मा. अध्यक्ष ह.भ.प नितीन महाराज मोरे यांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कै. भिकू वाघेरे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व माजी महापौर संजोग पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्मृतीदिनानिमित्त माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, डॉ. कैलास कदम काँग्रेस शहराध्यक्ष, इंडिया आघाडीचे नेते मानवजी कांबळे, देहू संस्थान अध्यक्ष ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज मोरे, ह.भ.प. संतोष महाराज मोरे, ह.भ.प. विजय बोत्रे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त मा. श्री. उल्हास जगताप साहेब, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, मा.नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, मा.नगरसेविका सुलक्षणाताई शिलवंत-धर, शिवसेनेचे मा. शहर प्रमुख योगेश बाबर, उपजिल्हा प्रमुख वैशाली मराठे, युवा सेना प्रमुख चेतन पवार युवा नेते विशाल वाकडकर, शिवसेनेच्या महिला शहर संघटिका अनिताताई तुतारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष फजल भाई शेख, कन्या विद्यालय मुख्याध्यापिका उर्मिला पाटील, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई मुंडे, सामाजिक न्याय अध्यक्ष गंगाताई धेंडे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ कुदळे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार योगेश कोंढाळकर यांनी मानले.





