दिघीत माजी सैनिकांचा भव्य मेळावा; भाजपाला जाहीर पाठिंबा
मिशन–PCMC : भाजपाच्या पॅनेलची प्रचारात दमदार आघाडी

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ (दिघी–बोपखेल) येथील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी सैनिकांचा भव्य मेळावा परांडे नगर येथील ऑक्सिजन बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माजी सैनिक संघाने भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा दिला.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी सैनिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध मागण्यांवर भाजपा सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन दिले. राष्ट्रसेवेसाठी माजी सैनिकांनी दिलेले योगदान अतुलनीय असून त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – उद्योगनगरीत लोकशाहीचा उत्सव, टाटा मोटर्समध्ये मतदानाची शपथ

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे यांनी महसूल मंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी दत्तात्रय आबा गायकवाड, संजय भाऊ गायकवाड, निर्मलाताई गायकवाड, कुलदीप भाऊ परांडे, विकास डोळस, चेतन घुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपाकडून श्रुती विकास डोळस, कृष्णा भिकाजी सुरकुले, हिरा नानी गोवर्धन घुले आणि उदय दत्तात्रय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मेळाव्यास ६०० हून अधिक माजी सैनिक उपस्थित होते.

विकासाच्या मुद्द्यांवर आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून माजी सैनिक भाजपाच्या विचारांसोबत असल्याने दिघी–बोपखेलमधील भाजपाचे चारही उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा ‘कमळ’ फुलेल आणि भाजपाचाच महापौर होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“‘राष्ट्र प्रथम’ या विचारधारेतून माजी सैनिक भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यांनी दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. त्यांच्या अपेक्षांना पात्र ठरेल असे नियोजनबद्ध विकासकाम करून दिघी–बोपखेलचा सर्वांगीण विकास घडवण्याचा आमचा ठाम संकल्प आहे,”
– उदय गायकवाड, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 4, दिघी- बोपखेल.




