Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उद्योगनगरीत लोकशाहीचा उत्सव, टाटा मोटर्समध्ये मतदानाची शपथ

फ्लॅश मॉब व पथनाट्यातून मतदानाचा जागर

पिंपरी चिंचवड :   महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. राज्य सरकारच्या औद्योगिक विभागाने त्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. या सुट्टीचा उपयोग सर्वप्रथम मतदानासाठी करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी व्यक्त केले.

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वीप  अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत आज पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीमध्ये भव्य मतदान शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या.  भारतरत्न जे. आर. डी. टाटा व रतन टाटा यांना अभिवादन करून सुरू करण्यात आलेल्या या मतदान शपथ कार्यक्रमात टाटा मोटर्स कंपनीतील अधिकाऱ्यांसह सुमारे ३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी मतदानाची शपथ घेत उत्स्फूर्तपणे लोकशाही उत्सवात सक्रिय सहभाग घेण्याचा व १००% मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

हेही वाचा –  ताथवडेमध्ये भाजप पॅनलचा जोरदार प्रचार; पवार, नवले आणि स्थानिकांचे बळ भाजपसोबत

महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह टाटा मोटर्सचे व्यवस्थापन अधिकारी आनंद लपारकर, आनंद आगाशे, डॉ. संतोष जाधव, अतुल आहिर, नितीन कदम तसेच कंपनीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार प्रदर्शन अण्णा बोदडे यांनी मानले.

फ्लॅश मॉब व पथनाट्याने जिंकली मने

मतदान जनजागृतीसाठी यावेळी लहान मुलांकडून सादर करण्यात आलेल्या फ्लॅश मॉबने उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणाचे कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून कौतुक करत मुलांना छोटी भेटवस्तू देऊन प्रोत्साहन दिले. याचबरोबर मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे पथनाट्य सादर करण्यात आले, ज्यातून नागरिकांनी मतदान का करावे, याचा प्रभावी संदेश देण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

टाटा मोटर्ससारख्या मोठ्या औद्योगिक संस्थेत घेतलेला मतदान शपथ कार्यक्रम हा संपूर्ण शहराला लोकशाही सहभागाचा संदेश देणारा ठरला आहे. सुदृढ, सक्षम आणि उत्तरदायी लोकशाहीसाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे ही केवळ जबाबदारी नसून ती लोकशाहीप्रतीची कर्तव्यभावना आहे.

 — अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button