Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अतिरिक्त आयुक्तपदासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांना संधी द्या- आमदार महेश लांडगे

पिंपरी |

पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त- २ या पदासाठी महापालिकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पहिले प्राधान्य द्यावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त- २ हे पद गेली अनेक दिवसांपासून रिक्त आहे. या पदासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती करावी. शहरातील सर्व पक्षीय नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना गेल्या दीड वर्षांपासून कोविड परिस्थितीमुळे आपआपल्या प्रभागात अपेक्षीत काम करता आलेले नाही.

अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामाची गती मंदावली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तपदी शहर आणि स्थानिक विकासकामांचा अनुभव असलेल्या व्यक्तीला संधी दिल्यास सर्वच नगरसेवकांची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. महापालिकेत सध्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी दिल्यास विकासकामांचे नियोजन सक्षम होणार आहे. तसेच, प्रकल्पांची गतीमानता वाढण्यास मदत होईल. तसेच,कामाचा ताणही कमी होणार आहे. त्यासाठी पूर्णवेळ अतिरिक्त आयुक्तपदी पालिकेतील अधिकाऱ्याला संधी दिल्यास विभागवार कामाचा निपटारा होईल, असेही आमदार लांडगे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

…या अधिकाऱ्यांना मिळू शकते संधी!

महापालिका अतिरिक्त आयुक्त- २ या पदावर महापालिकेतील अधिकाऱ्याला पदोन्नती दिल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार कुणाला संधी मिळेल, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील हे सेवाज्येष्ठतेनुसार अतिरिक्त आयुक्त-२ पदसाठी दावेदार आहेत. येत्या सहा-सात महिन्यांत पाटील सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाचे सर्वेसर्वा निळकंठ पोमन, जल नि:सारण आणि पर्यावरण विभागाचा अनुभव असलेले व अल्पावधीत आयुक्त राजेश पाटील यांच्या मर्जीतील अधिकारी अशी ओळख मिळवलेले रामदास तांबे, उपायुक्त आशा दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर आदी अधिकारी सेवाज्येष्ठता आणि उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर अतिरिक्त आयुक्त- २ पदासाठी दावेदार ठरु शकतात, अशी चर्चा आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button