breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीतील गणेशोत्सव नियमानुसारच होणार!

  •  समन्वय बैठकीत गणेश मंडळांची ग्वाही
  • स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांची माहिती

पिंपरी : प्रतिनिधी
गणेशोत्सवात शासनाने ठरवून दिलेले नियम आणि सूचनांचे तंतोतंत पालन होईल. चिखलीतील सर्व गणेशोत्सव मंडळांकडून पोलीस आणि प्रशासनानला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही रविवारी (दि.५) गणेश मंडळांनी गणेशोत्सव समन्वय बैठकीत दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेवाळे वस्ती येथे जय गणेश इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व पोलिस अधिकारी व क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी यांच्यात बैठक संपन्न झाली. यावेळी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, क्षेत्रीय अधिकारी सिताराम भहुरे, क्षेत्रीय सभापती कुंदन गायकवाड, स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, भास्कर तराकर, दिनेश ढवळे व यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. तसेच, अद्याप कोरोना संपला नसून, पिंपरी- चिंचवडमध्ये अद्यापही रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाबाबत नियम, अटी व मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाबाबत चर्चा आणि सूचना देण्यासाठी चिखली येथे गणेश मंडळे, पोलीस, स्थानिक लोकसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही गणेशोत्सव सध्या पद्धतीने आणि सर्व नियमांचे पालन करून साजरा करावा असा सूचना देण्यात आल्या. तसेच याबात मंडळांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केली.

तिसरी लाट नकोच !
यावेळी सर्व गणेश मंडळांनी नियम सूचना पाळण्याचा व पोलिसांना सहकार्य करण्याचा संकल्प केला. तसेच अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनाही नाकाबंदी व बंदोबस्त कामात मंडळांच्या स्वयंसेवकांनी मदत करण्याची तयारी दर्शवली. कोरोना हद्दपार व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे. यामुळे तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सर्वच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button