breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी कॅम्पमध्ये सोशल डिस्टनसिंगचा फज्जा!

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी – चिंचवडमध्येही कोरोना ससंर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाने अत्यावश्यक सेवांनाही सकाळी ११ पर्यंतच परवानगी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सणसुदीही साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री करत आहेत. उद्या ईदही साधेपणाने आणि नियम पाळून साजरी करावी असे सांगण्यात आले आहे. तरीही आज सकाळी पिंपरीतील कॅम्पमध्ये नागरिकांनी ईदच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.

रमझान ईदचा महिना मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानला जातो. अनेक दिवसांच्या उपवावासानंतर उद्याच्या दिवशी शिर कुरमा सारखे स्वादिष्ट पदार्थ तयार करतात. घरोघरी जाऊन सण साजरा केला जातो. त्यानिमित्ताने खरेदीसाठी नागरिक दरवर्षी बाहेर पडतात. पण यंदा कोरोनाची दुसरी लाट आल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. सर्व कार्यक्रमाबरोबरच सण, उत्सव यावर बंदी घालण्यात आली आहे. तेच धार्मिक विधी करून साधेपणाने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ईदच्या खरेदीसाठी झालेली गर्दी कोरोना वाढण्याचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत त्याठिकाणी एकही पोलीस नसल्याचे दिसून आले आहे. तसेच नागरिक सोशल डिस्टनसिंग पाळणे विसरल्याचे दिसत आहे. काहींनी तर मास्कही व्यवस्थित घातले नाहीत. ज्येष्ठांनाही बाहेर न पडण्याचे सांगण्यात आले आहे. पण या मार्केटमध्ये अनेक ज्येष्ठ दिसून आले आहेत. असेच जर नागरिक नियमांची पायमल्ली करून वागू लागले. तर कोरोनाला आटोक्यात आणणे हे प्रशासनासमोरील आव्हान असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button