Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

सच्च्या कलाकाराला बाहेर काढलात..; ‘बिग बॉस मराठी 6’च्या घरातून ‘चांगला माणूस’ बाहेर, नेटकऱ्यांची तीव्र नाराजी

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिझनचा खेळ आता चांगला रंगात आला आहे. घरातील सदस्यांचं वागणं, एकमेकांवरील कुरघोडी, कट-कारस्थानं, गेम-प्लॅनिंग अशा सर्व गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. या सिझनचा सहावा आठवडा नुकताच संपुष्टात आला असून या आठवड्याअखेर बिग बॉसच्या घरातून एकाला बाहेर पडावं लागलं आहे. रविवारी भाऊच्या धक्क्यावर सूत्रसंचालक रितेश देशमुखने ते नाव अखेर जाहीर केलं आणि त्या स्पर्धकाचं नाव ऐकताच घरातील सर्व सदस्यांना रडू कोसळलं. सहाव्या आठवड्यात सागर, राकेश, दीपाली, रोशन, अनुश्री, रुचिता, सचिन, प्राजक्ता आणि प्रभू असे एकूण नऊ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. या नऊपैकी सहा जण सुरक्षित ठरले आणि तीन जण डेंजर झोनमध्ये गेले.

रोशन, रुचिता आणि सचिन हे तिघे डेंजर झोनमध्ये होते. तिघांपैकी एकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागणार होतं. अखेर रितेशने ते नाव जाहीर केलं. सहाव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून गायक आणि खान्देशचा किंग म्हणून ओळखला जाणारा सचिन कुमावत एलिमिनेट झाला. घरातील एक चांगला माणूस म्हणून त्याने प्रेक्षकांमध्ये ओळख बनवली होती. परंतु बिग बॉसचा खेळ त्याला फारसा समजलेला नव्हता. अत्यंत साध्या स्वभावाचा सचिन बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचं गेम-प्लॅनिंग, कट-कारस्थान ओळखण्यात कुठेतरी कमी पडला, अशी भावना नेटकरी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा –  अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सचिन दादा मनाने चांगले आहात, पण असा शो तुमच्यासाठी नाहीये. इथे साधी सरळ माणसं नाही राहू शकत, अशी कमेंट एका युजरने केली. तर माणुसकीचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन भाऊ, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. चांगल्या माणसालाच बिग बॉसच्या घरातून बाहेर काढलं जातं, बिग बॉसकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान बिग बॉसचा खेळ दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालला आहे. स्पर्धक एकमेकांवर कुरघोडी करून स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात अखेरपर्यंत कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button