पिंपळे गुरवला मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन ११०० नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ
![Free health check-up camp organized by Pimple Gurwala 1100 citizens took advantage of the camp](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Image-2021-09-09-at-11.35.11-AM-3.jpeg)
महेशदादा जगताप यांच्यातर्फे आयोजित उपक्रमांचे महापौर माई ढोरे व आ.लक्ष्मणभाऊ जगताप यांनी केले कौतुक
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक महेश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन बुधवारी (दि.०८)चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पार पडले. महेशदादा जगताप मित्र परिवारातर्फे रामकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी मनपा सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके माजी नगरसेवक तथा उद्योजक शंकरशेठ जगताप , नगरसेवक शशिकांत कदम, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे,‘ड’ प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर,नगरसेवक अंबरनाथ कांबळे,नगरसेवक संतोष कांबळे,नगरसेविका उषा मुंढे,नगरसेविका सीमा चौगुले,नगरसेविका माधवी राजापुरे,नगरसेविका शारदा सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते कैलास जगताप, माजी नगरसेविका कल्पना जगताप, पल्लवी जगताप,अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष अजय दुधभाते,शिवाजी कदम, हिरेन सोनवणे,उद्योजक संजय भिसे संतोष कलाटे आदींसह छत्रपती शिवाजी मित्र मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या शिबिरात विविध ठिकाणच्या हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आजाराचे निदान झालेल्या रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत.
यावेळी डॉ. सतिश कांबळे व डॉ. फसके यांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल तर उद्योजक शंकरशेठ जगताप यांचा चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधी स्थळ देखभाल दायित्व घेतल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. दरम्यान यावेळी बोलताना महापौर माई ढोरे म्हणाल्या , आ. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महेश जगताप यांनी वाढदिवसाचा इतर खर्च टाळून आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य शिबिराचा परिसरातील गरजूंना नक्क्कीच फायदा होणार आहे.’ रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून आयोजित या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक असून नागरिकांचे आरोग्यहित जोपासणारे असे समाजोपयोगी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. दरम्यान शिबिराच्या पहिल्याच दिवशी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी तब्बल ११०० जणांनी शिबिराचा लाभ घेतल्याचे संयोजकांनी सांगितले. शिवाजी कदम यांनी सूत्रसंचालन केले तर नगरसेवक शशिकांत कदम यांनी आभार मानले.