Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
अमित गोरखे फाऊंडेशनच्या वतीने कोरोना रुग्णांना शतप्लस औषधाचे मोफत वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/अमित-गोरखे.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व स्वर्गीय तात्या बापट स्मृती समिती संचालित कोविड आयसोल्युशन सेंटर यमुनानगर येथे आज अमित गोरखे युथ फाऊंडेशनच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी शत- प्लस हे औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कोविड आयसोलेशन सेंटरचे व्यवस्थापक विनोद डोरले, पराग सहस्रबुद्धे, अमित गोरखे, शेखर साळवे, निलेश क्षीरसागर, अमोल कुचेकर आदी उपस्थिती होते.
शतप्लस कोरोनावर प्रभावी गुणकारी औषध असून औषधामध्ये अँटी ऑक्सीडेंट, अँटी इन्फर्मेशन, अँटी वायरल रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे इत्यादी मात्रा आहेत. नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणीत सहयोगी औषध पद्धती म्हणून चांगल्या पद्धतीने हे औषध वापरले जाते. या औषधांमुळे कोरोना रुग्णांमध्ये चांगली सुधारणा झाल्याचा अनुभव आलेला आहे, असा अनुभव डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.