ऑनलाईन माध्यमातून महिलेची चार लाखांची फसवणूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/cheating-crime.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
ऑनलाईन माध्यमातून कर्ज घेणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. घेतलेल्या कर्जाचे पैसे भरण्यास सांगून एनोसी मिळविण्यासाठी महिलेकडून तीन लाख 94 हजार रुपये उकळले. त्यानंतर महिलेने पैसे देणे बंद केल्याने अश्लील मेसेज तिच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली. ही घटना 6 फेब्रुवारी 2021 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.
अमित मोबाईल नंबर 9792497619, मॅनेजर राहुल शर्मा मोबाईल नंबर 7233879889, समीर मोबाईल नंबर 9682793856, मोबाईल नंबर धारक 7304591119, 9821127681, 8859487663, 7065121843 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने ऑनलाईन माध्यमातून कर्ज घेतले होते. त्या कर्जाचे पैसे भरण्यास सांगून एनोसी मिळविण्यासाठी व वेगवेळी करणे सांगून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून तीन लाख 94 हजार 232 रुपये ऑनलाईन माध्यमातून स्वीकारले. हे कर्जाचे प्रकरण न मिटवता आरोपींनी फिर्यादी यांची फसवणूक केली. फिर्यादी यांनी पैसे देण्याचे बंद केल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन व मेसेज करून त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादी यांच्या कागदपत्रांच्या आधारे मिळालेल्या खाजगी माहितीवरून त्यांच्या नातवाईकांना फिर्यादीबाबत अश्लील मेसेज पाठवण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.