Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापौर विकास निधीतून चार अम्ब्युलन्स आणि एक रक्तपेढी लवकरच सुरू होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/freepressjournal_2020-04_5ff124ee-0567-4f08-9aed-8b7ca5917ac4_PCMC__1_.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर विकास निधीतून चार अम्ब्युलन्स व एक रक्तपेढी (प्लाझ्मा पेढीसह) नागरिकांसाठी देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत. अनेक रुग्णांना वाहतुकीसाठी अम्ब्युलन्स उपलब्ध नाही. त्यामुळे महापौर निधीतून चार अम्ब्युलन्स खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामध्ये दोन कार्डियाक अम्ब्युलन्स असणार आहेत. तसेच, एक रक्तपेढी (प्लाझ्मा पेढीसह) सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.