माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
![Former Opposition Leader Nana Kate's birthday celebrated with various activities](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-16-at-18.59.38.jpeg)
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा वाढदिवस (दि. 15) समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त प्रभागातील विविध सोसायटी व शाळेमध्ये नगरसेवक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्य दिन आणि वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका शितल नाना काटे व रुबी अलकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये 2 डी
इको, इसीजी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. निदान झालेल्या रुग्णांची महात्मा फुले जन धन योजनेअंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.
तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २५१जणांनी रक्तदान केले. नगरसेविका शितल काटे यांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला एक भेटवस्तू देण्यात आली.प्रभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त नगरसेवक नाना काटे यांना शहरातील अध्यात्मिक, राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, आमदार महेश लांडगे,कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे ,विरोधी पक्षनेता राजू मिसाळ,नगरसेवक राहुल कलाटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे,नगरसेवक योगेश बहल,अजित गव्हाणे,मयूर कलाटे,संतोष कोकणे,विनोद नढे,पंकज भालेकर,प्रवीण भालेकर,राजू बनसोडे,नगरसेविका उषामाई काळे,सायली रमेश वांजळे-शिंदे ,रमाताई सनी ओव्हाळ,मा.नगरसेवक खंडूशेठ कोकणे,कैलासभाऊ थोपटे,सतिश दरेकर,प्रभाकर वाघेरे,मच्छिंद्र तापकीर, गणेश भोंडवे ,राजेंद्र साळुंके,अरुण टाक,युवक अध्यक्ष विशाल वाकडकर,सरचिटणीस विशाल काळभोर,निरीक्षक पिंपरी भोसरी विधानसभा लाला चिंचवडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदिप चिंचवडे,विद्यार्थी अध्यक्ष यश साने,सामाजिक न्याय विभाग विनोद कांबळे शाम जगताप, शेखर काटे विनोद तापकीर,राज तापकीर,अतिश बारणे,शिवाजी पाडुळे,अमर आदियाल,तानाजी भोंडवे,धनाजी विनोदे,नरेशअप्पा खुळे, बाळासाहेब नढे,हिंजवडीचे सरपंच सागर हुलावळे,हभप गंभीर महाराज ,प्रभाकर ववले,विशाल काळे , भारत लिमण,प्रसाद लिमण,बांधकाम व्यावसायिक नरेशशेठ वाधवानी,विनोद शेठ चांदवाणी ,योगेश मालपुरे,किरण शहा, लोटस हॉस्पिटलचे शिव अगरवाल,स्टर्लिंग हॉस्पिटलचे डॉ.विनायक शिंदे यांनी काटे यांना शुभेच्छा दिल्या.