गड, किल्ल्यांच्या माहितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचा- प्रकाश जवळकर
![For information on forts, read the biography of Chhatrapati Shivaji Maharaj - Prakash Jawalkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-16T200057.331.jpg)
पिंपरी चिंचवड | बालगोपाळ आणि तरुण पिढीला देशातील गड किल्ले यांच्या सखोल माहितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र वाचून त्याचा अंगिकार केल्यास गड किल्ले यांचा इतिहास आणि त्यांचे महत्व तुमच्या लक्षात येईल. असे उद्गार भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशतात्या जवळकर यांनी याप्रसंगी काढले.कासारवाडी येथील सत्कर्म सोशल फाऊंडेशन आणि गणेश जवळकर सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा पिंपरी – चिंचवड शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गड, किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी जवळकर बोलत होते.दरम्यान, तीन यशस्वी स्पर्धकांना ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हा चिटणीस देवदत्त लांडे, सरचिटणीस गणेश जवळकर, उद्योजक बाळासाहेब जवळकर, अर्जूनभाऊ जवळकर, आप्पासाहेब धावडे, बबनराव जवळकर, संतोष टोणगे, आबासाहेब जवळकर, आदी उपस्थित होते.
यावेळी बालदिनानिमित्त सर्व बालगोपाळांना खाऊ वाटप करण्यात आला. गणेश जवळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. देवदत्त लांडे यांनी मनोगत व्यक्त केले आणि उद्योजक रघुनाथ जवळकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश जवळकर, दिगंबर शेंडे, गोरडे, अभिजीत जवळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.