तळवडेतील आग दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत
शांताराम भालेकर यांचा विधायक पुढाकार : सामाजिक दायित्व जपण्याचा प्रयत्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Untitled-design-61-780x470.jpg)
पिंपरी : माजी नगरसेवक शांताराम भालेकर उर्फ एस.के.बापू यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तळवडे-ज्योतीबानगर येथील स्पार्कल कॅण्डल कंपनीतील दुर्घटना ग्रस्तांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली.
प्रत्येक कुटुंबास १ लाख रुपये असे एकूण १५ कुटुंबीयांना तब्बल १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मृतांचा कुटुंबीयांना लोकवर्गणीतून रोख स्वरूपात देणगीदार, उद्योजक व मान्यवर यांच्या सुपूर्त करण्यात आली. या विधायक कार्याचे सामाजिक क्षेत्रात कौतूक होत आहे.
या प्रसंगी संगीता भालेकर, के.डी. वाघमारे, सुजाता काटे, शितल वर्णेकर, विठ्ठल भालेकर, अरुण थोपटे, देवी इंद्रायणीचे बिर्जे, रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष वसंत पतंगे, घरजाईमाता ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष गौतम मोकाशे यांनी मनोगत व्यक्त केले.
शांताराम बाप्पू भालेकर यांनी आपल्या प्रस्ताविका मध्ये वाढदिवसाच्या औचित्य साधून कुठल्याही प्रकारचा ऑर्केस्ट्रा व इतर मनोरंजनाचा कार्यक्रम टाळून, आपण समाजकार्य करत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही संकल्पना डोळ्यापुढे ठेवून दुर्घटनेतील कुटुंबीयांच्या वारसांना लोकवर्गणीतून आर्थिक मदत देण्याचा मानस पूर्ण केला.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता अजितदादांची; हवा रोहीतदादांची!
तळवडेतील आग दुर्घटनेमध्ये मृत व जखमी झालेले रमा देवेंद्र आबदार, पुनम अभय मिश्रा, लता भारत दंगेकर, मंगल बाबासो खरबडे, कमलादेवी सुरज प्रजापती, राधा सयाजी गोधडे, कविता गणेश राठोड, शिल्पा गणेश राठोड, प्रियंका अमोल यादव, अपेक्षा अशोक तोरणे, प्रतीक्षा अशोक तोरणे, सुमन सयाजी गोधडे, कमल गणू चौरे, उषा सिताराम पाडवी, रेणुका मारुती ताथोड (जखमी) या दुर्घटनाग्रस्थांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.