Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Pune : स्वातंत्र्यदिनी प्रसिद्ध गायिकेने केला तिरंग्याचा अपमान, FIR दाखल

पुणे : १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या स्वातंत्र्यदिनानिमित्त सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. असं असताना एका प्रसिद्ध गायिकेवर भारतीय तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपुर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रसिद्ध गायिका उमा शांती यांचा हा व्हिडीओ आहे. १४ ऑगस्ट रोजी पुण्यातील मुंडवा परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये उमा शांती म्युझिक बँडसोबत परफॉर्म करत होती. तेव्हा उमा हिने असं काही केलं ज्यामुळे गायिकेविरूद्ध FIR दाखल केली आहे.

हेही वाचा – भारताने वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक ध्येये पादाक्रांत केली आहेत : अनिता काटे

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

व्हिडीओमध्ये गायिका उमा दोन्ही हातात तिरंगा फडकवत परफॉर्म करताना दिसत आहे. त्यानंतर तिने तिरंगा प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावला. गायिका तिच्या या कृतीमुळे अडचणीत सापडली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे. तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी उमा शांती आणि कार्यक्रमाच्या आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button