ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
![Filed a case of atrocity in a case of racist abuse](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/crime-police-FIR-1.jpg)
पिंपरी चिंचवड | सोसायटीमध्ये फ्लॅट खरेदी केल्यानंतर कागदपत्रे घेऊन सोसायटीत गेलेल्या व्यक्तीला दोघांनी मिळून जातीवाचक शिवीगाळ केली. हा प्रकार सहा ऑक्टोबर 2019 रोजी कुदळवाडी चिखली येथे घडला.कुंडलिक धोंडीबा मोरे (रा. कुदळवाडी, चिखली) आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी कुंडलीक मोरे यांच्याकडून कुदळवाडी येथील प्रथमेश पार्क या सोसायटीमध्ये फ्लॅट खरेदी केला. त्या फ्लॅटचे कागदपत्र घेऊन फिर्यादी सोसायटी मध्ये गेले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना जातिवाचक शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील याप्रकरणी अधिकचा तपास करीत आहेत.