पिंपरी / चिंचवड

फसवणूक प्रकरणी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी | प्रतिनिधी

जमीन खरेदीच्या व्यवहारात 34 लाखांची फसवणूक करत पती-पत्नीने मिळून एका महिलेच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला. हा प्रकार 19 नोव्हेंबर 2019 ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत समर्थनगर, दिघी येथे घडला.

धर्माजी दशरथ आंबेकर, सविता धर्माजी आंबेकर (दोघे रा. दाभाडेवस्ती, च-होली बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी गौरी नितीन गावडे (वय 30, रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची समर्थनगर दिघी येथे शून्य.70 चौरस मीटर जागा आहे. ही जागा आरोपींना 36 लाख रुपयांना विक्री करण्याचे ठरले. त्यातील दोन लाख रुपये आरोपींनी धनादेशाद्वारे फिर्यादी यांना दिले. उर्वरित 34 लाख रुपये खरेदी खताच्या वेळी देण्याचे ठरले. आरोपींनी खरेदीखताच्यावेळी फिर्यादी यांना उरलेले 34 लाख रुपये दिले नाहीत. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करून त्यांच्या जागेत बेकायदेशीर कब्जा केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button