Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

FACT CHECK : टेल्को रस्ता होणार ‘‘हायफाय’’; 90 कोटींची उधळपट्टी?

काय आहे वस्तुस्थिती? : गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौक टेल्को रस्त्याचा प्रश्न

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरातील 61 मीटर रुंदीचे अंतर्गत रस्ते केवळ दोन आहेत. त्यामधील एक गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौक अर्थात टेल्को रस्ता आता ‘हायफाय’ होणार आहे. या रस्त्याचे काम महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. सुमारे 90 कोटी रुपयांचा खर्च त्यासाठी करण्यात येणार आहे. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केल्यादा दावा करीत या रस्त्याच्या कामाला गालबोट लावण्यात येत आहे. याबाबत ‘महाईन्यूज’ च्या माध्यमातून ‘FACT CHECK’ करण्यात आली.

टेल्को रस्ता हा शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. टेल्को रस्त्याची एकुण लांबी 8500 मीटर इतकी आहे. त्यापैकी गवळी माथा ते इंद्रायणी नगर चौकापर्यंतचा रस्ता अद्यायावत पद्धतीने विकसित करण्याचे नियोजित असून त्याची लांबी 1175 मी. व विकास आराखड्याप्रमाणे रस्त्याची रुंदी 61 मी. आहे. त्यास अनुसरुन सदर रस्त्याचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणुन मे. मॅप्स ग्लोबल सिव्हीलटेक प्रा. लि. यांची रीतसर नेमणुक करणेत आलेली आहे. मे. मॅप्स ग्लोबल सिव्हीलटेक प्रा. लि. यांनी सदर रस्त्याचे आवश्यक सर्वेक्षण करुन नकाशे व अंदाजपत्रक तयार केले आहे.

सदर अंदाजपत्रकामध्ये स्थापत्यविषयक कामे, विद्युतविषयक कामे, पाणीपुरवठा व जलनिःसारणविषयक कामे इ. बाबींचा समावेश करणेत आलेला आहे. त्यामुळे केवळ रस्त्याच्या कामावर 90 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे, असा FAKE NARRATIVE करण्याचा प्रयत्न चव्हाट्यावर आला आहे.

काय आहे प्रकल्प?

अ) रस्त्याचे रुंदीकरणः
सद्यस्थितीत टेल्को रस्ता सहा पदरी आहे. परंतु, तो अपुरा पडत असल्याचे ट्राफिक सर्वेक्षणातून स्पष्ट होते. त्यामुळे, रस्त्याच्या दोन्ही बाजूस एक लेन वाढवून हा रस्ता एकूण आठ पदरी करण्यात येणार आहे. तसेच, पार्किंगसाठी स्वतंत्र लेन तयार करण्यात येणार आहे.अस्तित्वातील मुख्य रस्त्यावर DBM आणि BC चा थर देऊन रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस ९०० मिमी. व्यासाची पावसाळी वाहिनी नव्याने टाकणेत येणार आहे.रस्त्याला नवीन उंच दुभाजक बसविण्यात येणार आहे.

ब) सेवा रस्त्याचे विकसनः
अस्तित्वातील सेवा रस्ता 900मिमी. व्यासाच्या पावसाळी वाहिनीसहित अद्ययावत पद्धतीने विकसित करणेत येणार आहे. तसेच, आवश्यक त्या ठिकाणी नविन सेवा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.

क) रस्त्याचे अद्यावत पद्धतीने विकसनः
1. पार्किंग-2.5 मी.
2. Multi Utility Zone (MUZ)- 1.0 मी.
3. सायकल ट्रॅक-2.5 मी.
4. ग्रीन झोन-1.0 मी.
5. फुटपाथ-3.0 मी.
6. सेवा वाहिन्या-9 नग
7. Recreational Area / सेवा रस्ता-7.0 मी.
8. जिम
9. दोन ठिकाणी नागरिकांसाठी शौचालय बांधण्यात येणार आहेत.

ड) विद्युत विभागाची कामे:
अस्तित्वातील उच्च दाब व कमी दाबाच्या सुमारे 26 वे च्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. रस्त्यावर आकर्षक पथदिवे बसविण्यात येणार आहेत.

इ) पाणीपुरवठा व जलनिःसारण विभागाची कामे:

एमआयडीसी व पिंपरी चिंचवड मनपाच्या सुमारे पाच जलवाहिन्या स्थलांतरित करणेत अथवा नवीन टाकणेत येणार आहेत. 300 मिमी. व 450 मिमी. व्यासाच्या नवीन जलनिःसारण वाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
***

प्रकल्पाच्या खर्चाचे वर्गीकरण :

प्रशासकीय मान्यता र. रु. : र.रु. 1,11,00,00,000/-
निविदा र. रु.
1. स्थापत्य : र.रु. 55, 18,88,942/-
2. पाणीपुरवठा:  र.रु 8,58,26,059/-
3. जलनिःसारण: र.रु. 1,98,08,650/-4. विद्युत- र.रु. 24,90,53,804/-

एकुण निविदा : र. रु. 90,65,77,455/-

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button