गुजरातच्या जामनगर जिल्ह्यात लढाऊ विमानाला मोठा अपघात
अपघातानंतर विमानाचे अनेक तुकडे ,मोठी आग लागली असून अपघातस्थळी ग्रामस्थ, पोलिस आणि प्रशासन दाखल

गुजरात : गुजरातच्या जामनगर जिल्ह्यात लढाऊ विमानाला मोठा अपघात झाला आहे. बुधवारी रात्री उशीरा कलावड रोडवर सुवरदा गावांच्या बाहेरील परिसरात भारतीय वायू सेनेचे जग्वार विमान कोसळूल्याची घटना घडली आहे. या विमानाचे तुकडे सर्वत पसरले असून सर्वत्र आगीचे लोळ उठल्याने गावकरी घाबरले. सुवरदा गावातील लोकांना कानठळ्या बसविणारा आवाज ऐकायला आल्याने ते घटनास्थळी पोहचले. या दुर्घटनेसंबंधी स्थानिक पोलिसांना कळवल्यानंतर पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहचले आहे.
हेही वाचा – महापालिकेस विक्रमी उत्पन्न; ८ हजार २७२ कोटींचा आकडा पार
गुजरातमधील जामनगरच्या बाहेर एक लढाऊ विमान कोसळल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे.. ही घटना कलावड रोडवरील सुवर्णा गावाजवळ घडली. या लढावू विमानाच्या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा एक पायलट जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर विमानाचे अनेक तुकडे झाले. त्याला मोठी आग लागली असून अपघातस्थळी ग्रामस्थ, पोलिस आणि प्रशासन दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.
यापूर्वी ७ मार्च रोजी हरियाणातील पंचकुला येथे तांत्रिक बिघाडामुळे हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले होते. हे लढाऊ विमान अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षणासाठी निघाले होते.
या अपघातात, वैमानिक जेटमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला. त्याच दिवशी, रशियन बनावटीचे भारतीय हवाई दलाचे AN-32 हे वाहतूक विमान पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे उतरल्यानंतर कोसळले.