ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका अभय योजनेला मुदतवाढ द्या : नगरसेवक कुंदन गायकवाड

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन

पिंपरी-चिंचवड | शहरातील थकीत मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळावा या उद्देशाने “अभय योजना”ला मुदतवाढ देण्याची ठाम मागणी नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे शहरातील हजारो मालमत्ताधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, १ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या “अभय योजना”मुळे करदात्यांना दंडावर तब्बल ९० टक्के सवलत देण्यात आली होती. या योजनेचा उद्देश थकीत कर वसुली वाढवणे आणि नागरिकांना आर्थिक दिलासा देणे हा होता.

हेही वाचा        :            PCMC: दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्प आदर्शवत! 

गायकवाड यांच्या मते, ही योजना अल्प कालावधीसाठी राबविण्यात आल्यामुळे आणि तिचा पुरेसा प्रसार न झाल्यामुळे अनेक नागरिक या लाभापासून वंचित राहिले. “शहरात अजूनही मोठ्या प्रमाणात थकीत कर बाकी आहे. अनेक नागरिकांना या योजनेची माहिती उशिरा मिळाली. त्यामुळे त्यांना सवलतीचा लाभ घेता आला नाही,” असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे, किमान एक महिना तरी या योजनेची मुदतवाढ देण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या प्रस्तावामुळे महापालिकेच्या महसुलात वाढ होण्यासोबतच नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

स्थानिक पातळीवर गायकवाड यांच्या या मागणीचे स्वागत होत असून, “ही मुदतवाढ मिळाल्यास अनेक करदाते पुढे येऊन थकीत रक्कम भरण्यास तयार होतील,” अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

अभय योजनेची मुदतवाढ मिळाल्यास शहरातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत या सवलतीचा लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊ. थकीत कराचा प्रश्न सोडवून नागरिकांना दिलासा देणे आणि महापालिकेच्या महसुलात भर घालणे, हेच आमचे प्राधान्य राहील.

– कुंदन गायकवाड, नगरसेवक, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button