ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्प आदर्शवत!

महापालिकेचा आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिन अनोख्या उपक्रमांनी साजरा

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दापोडी येथील आनंदवन झिरो वेस्ट प्रकल्पात आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन उत्साहपूर्ण व नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, तसेच सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

हेही वाचा       :            शहरात अवकाळी पाऊस आणि गारपीट; आयटी हबमध्ये डोंगराळ वातावरणाचा अनुभव 

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या पथनाट्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शून्य कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे चार प्रकारे विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, ‘आर.आर.आर. सेंटर’ची संकल्पना तसेच घरगुती कंपोस्टिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर नाट्यमय व प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

तसेच उपस्थितांना दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्पाची सविस्तर माहिती देत कचरा व्यवस्थापनातील आधुनिक उपाययोजनांची ओळख करून देण्यात आली. या कार्यक्रमास सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, दीपक कोटीयाना, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, नितीन तुपे, सचिन जाधव, ओंकार शिवणकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button