Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवडमधून भाजपाची सत्ता हद्दपार करा : दिलीपराव पवार
![Expel BJP from Pimpri-Chinchwad: Diliprao Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/bjp-andolan-pcmc.jpeg)
पिंपरी । प्रतिनिधी
शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे करुन देशातील कष्टकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भारतीय जनता पार्टीला पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तेतून हद्दपार करा, असे आवाहन श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीपराव पवार यांनी केले.
शेतकरी व कामगार विरोधी कायदे करणारे केंद्र सकराचा निषेध करण्यासाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भारत बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते.
केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) ‘भारत बंद’ ला सुरुवात झाली आहे. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांनी विविध महामार्गावरील रस्ते तसेच रेल्वे मार्ग अडवून धरले आहेत.