पर्यावरण संवर्धनाचा संदेश : ” नक्षत्रम”चे सौर ऊर्जा निर्मितीत पुढचे पाऊल !
नक्षत्रम एन विंग सहकारी गृह संस्थेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

पिंपरी : ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील आगामी आव्हाने लक्षात घेऊन पर्यावरण पूरक अशा सौर ऊर्जा निर्मितीसाठी सोसायट्यांमधून पुढाकार घेतला जात असल्याचे दिसून येत आहे .चिंचवड येथील नक्षत्रम एन विंग सहकारी गृहसंस्थेच्या वतीने सौर ऊर्जा निर्मितीत पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. सोसायटीने ४५ किलो वॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला असून नुकतेच या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

नक्षत्रम एन विंग सहकारी गृह संस्था मर्यादित चिंचवड प्रेमलोक येथील संस्थेने उभारण्यात आलेल्या ४५ किलो वॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिवाकर देशमुख व सहाय्यक अभियंता प्रणोती पाटील यांच्या हस्ते पार पडले.
हेही वाचा – भाजपशासित राज्यांत समान नागरी कायदा; अमित शाह यांची राज्यसभेत घोषणा

प्रणोती पाटील म्हणाल्या, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.यातून निसर्ग परिसंस्थेचे जतन होणार आहे. विज निर्मितीची तुट यातून पूर्ण होऊ शकेल. यामध्ये नागरिकांना महावितरणचे सहकार्य नक्कीच लाभणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नक्षत्रम एन विंग संस्थेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या खजिनदार रश्मी ढेरे, धवल गोयल, विराल ठक्कर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेच्या सेक्रेटरीअश्विनी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ऊदय चौगुले यांनी केले.
सौर ऊर्जा प्रकल्पाकडे कोणत्याही गृहनिर्माण संस्थेने किंवा व्यावसायिक आस्थापनांनी खर्च म्हणून पाहू नये. निसर्गाचे संवर्धन करून आपल्या आगामी पिढीसाठी पर्यावरण सुस्थितीत ठेवण्यासाठी ही एक मोठी गुंतवणूक आहे असे मानले पाहिजे. यातूनच निसर्गाचे संवर्धन होणार आहे.यासाठी महावितरण सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.
– दिवाकर देशमुख, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण.





