नेहरुनगर येथे ‘खेळ रंगला पैठणीचा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
![Enthusiastic response to Khel Rangala Paithanicha in Nehrunagar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Mahesh-Landge-1-2-780x470.jpg)
भीमाशंकराला अभिषेक अन् तळवडेत रंगला कीर्तन सोहळा
पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, अध्यात्मिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरुनगर येथे आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला परिसरातील महिला-नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पिंपरी-चिंचवड भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे माजी शहराध्यक्ष फारुक इनामदार यांच्या वतीने सिने कलाकार क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत ‘खेळ रंगला पैठणी’चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे यांनी उपस्थिती लावली.
यावेळी भाजपाचे उपशहराध्यक्ष अजय पाताडे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे, माजी स्वीकृत नगरसेविका वैशाली खाडे, माजी शिक्षण मंडळ सभापती अर्जुन ठाकरे, निगडी चिखली मंडलाध्यक्ष महदेव कवीतके आदी उपस्थित होते. क्रांती युथ मंडळ ट्रस्ट सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आयोजन केले.
विविध भेटवस्तुंची उधळण..
कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली व विजेत्या महिलांना पैठण्या व अनुक्रमे पारितोषिके सिमा उकीर्डे-प्रथम क्रमांक-टेलिव्हिजन सेट ( Tv ),शक्ती निंबर्गी-द्वितीय क्रमांक-रेफ्रीजिरेटर ( फ्रीज ), कविता विजय पाटील-तृतीय क्रमांक-वॉशिंग मशीन, अश्विनी राहूल कापरे-चतुर्थ क्रमांक-इलेक्ट्रॉनिक स्टोव्ह,शारदा कदम-पाचवा क्रमांक-मिक्सर ग्रॅंडर अशा पद्धतीने पारितोषिक वितरण करण्यात आले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठे अश्व-देशी गोवंश पशु प्रदर्शन
महेश लांडगेंच्या दीर्घायुष्यासाठी भीमाशंकराला अभिषेक..
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक लोकप्रतिनिधींनी बारा ज्योतिर्लिंग पैकी श्री क्षेत्र भिमाशंकर ज्योतिर्लिंग येथे अभिषेक करण्यात आला. या वेळी आमदार लांडगे यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. या वेळी माजी स्वीकृत नगरसेवक सागर हिंगणे, गणेश सस्ते, भानुदास आल्हाट, प्रमोद सस्ते, विनायक जाधव, रोहन बोराटे, गणेश नटवे, पुरोहित मधु अण्णा गवांदे, गोरक्ष कौदरे, अंकुश कौदरे आदींनी अभिषेक घातला.
तळवडे येथे माऊली महाराज पठाडे यांचे कीर्तन..
तळवडे येथील सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता भालेकर आणि उद्योजक अनिल भालेकर यांच्या पुढाकाराने ह.भ.प. माऊली महाराज पठाडे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार लांडगे यांचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पगडी आणि श्री. विठुरायाची मूर्ती व तुळशीमाळा घेवून सन्मान करण्यात आला. अध्यात्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करुन भालेकर आणि सहकाऱ्यांनी आदर्श निर्माण केला आहे.