कार खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाच्या पैशांचा अपहार : सेल्स मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/crime-police-FIR.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
कार घेण्यासाठी आजच्याआज डाऊनपेमेंट करावे लागेल असे सांगत ग्राहकाकडून स्वताच्या बँक खात्यावर तीन लाख रुपये घेऊन त्या पैशांचा अपहार केला. याप्रकरणी शोरूममधील सेल्स मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 2) दुपारी साडेबारा ते तीन वाजताच्या कालावधीत भूमकर चौक येथी नेक्सा शोरूम आणि रावेत येथील एका बँकेत घडला.
कृष्णा धनराज हंबीर (वय 27, रा. मंत्रीनगर, लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या सेल्स मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत मुरलीधर ठाकरे (वय 32, रा. ताथवडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कार खरेदी करण्यासाठी भूमकर चौक येथील नेक्सा शोरूम मध्ये गेले. तिथे आरोपी सेल्स मॅनेजर त्यांना भेटला. त्याने फिर्यादी यांना ‘आज चार लाख रुपये डाऊनपेमेंट करावे लागेल. त्यानंतर लगेच तुम्हाला उद्या गाडी भेटेल’ असा विश्वास दाखवला.
फिर्यादी यांनी रावेत येथील महाराष्ट्र बँकेत घेऊन जाऊन फिर्यादी कडून शोरूमच्या बँक खात्यावर पैसे भरून न घेता स्वताच्या बँक खात्यावर तीन लाख रुपये भरण्यास आरोपीने भाग पाडले. त्यानंतर त्या रकमेचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.