शिक्षण विश्व: फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन हवा : डॉ. बुरांडे
स्वागत व शपथग्रहण; राजमाता फार्मसीमधे विद्यार्थ्यांचा समारोह उत्साहात
![Education, world, pharmacy, field, student, positive, attitude, Dr. Burande,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/farmasi-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड : फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) हे देशातील सर्वांत विकसित आणि नैतिकदृष्टया आव्हानात्मक क्षेत्र आहे. फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन, वैयक्तिक, सामाजिक भान असणे गरजेचे आहे असे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एजुकेशन अँड रिसर्च, पुणे,चे संचालक डॉ.महेश बुरांडे म्हणाले.
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या डूडूळगाव शैक्षणिक संकुलातील कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे (दि .२४) प्रथम वर्ष बी.फार्म,डी.फार्म व एम फार्मसीत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारोह व शपथग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास १९० हून अधिक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
समारंभाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे होते. शपथग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एजुकेशन अँड रिसर्च, पुणे,चे संचालक डॉ.महेश बुरांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.महेश बुरांडे यांनी फार्मसी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, वैयक्तिक, सामाजिक, परीसंस्थात्मक व राष्ट्रीय ध्येय कसे गाठायचे याचे उत्तम मार्गदर्शन आपल्या भाषणातून केले. तसेच कॅलेंडर प्रकाशन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून *ड्रग डिस्कव्हरी टोरंट रिसर्च सेंटरचे ( अहमदाबाद ) संचालक डॉ.ए.बी.मांढरे उपस्थित होते. संस्थेचे दर वर्षा प्रमाणेचे अलुमणी कॅलेंडर महाविद्यालयाचे प्रा.आशिष फुगे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. निलेश जाधव , डॉ.ज्योती कदम यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन प्रा.डॉ.अमोल कुंभार , प्रा. अर्चना ठिकेकर व प्रा. योगिता आढाव यांनी केले.
हेही वाचा : पुण्यातील पुष्प प्रदर्शनाची परंपरा युवकांनी जपावी; सुहास दिवसे
व्यवस्थापन प्रतिनिधी प्रा. किरण चौधरी, संस्थेचे रजिस्ट्रार अश्विनी भोसले , सचिव सुधीर मुंगसे, खजिनदार अजित दा.गव्हाणे, संस्थेचे विश्वस्त विक्रांत लांडे, विश्वस्त सुमित मुंगसे यांनी यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले. प्रा.नीलाक्षी नेरकर व अश्विनी मुळूक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ.निलेश जाधव यांनी आभार मानले.
फार्मसी हे दुसरे प्रगतीशील क्षेत्र …
फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) हे देशातील सर्वांत विकसित आणि नैतिकदृष्टया आव्हानात्मक क्षेत्र आहे. फार्मसी शाखा ही आरोग्य विज्ञानातील प्रमुख शाखांपैकी एक आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रानंतर फार्मसी हे दुसरे प्रगतीशील क्षेत्र ओळखले जाते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर एस.जैन यांनी औषधनिर्माण क्षेत्र यामधील उद्योजकता विकास व नावीन्यपुंर्ण प्रकल्प याबद्दल मोलाची माहिती सांगितली. तसेच राजमाता औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे वैशिष्ट्य, विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती, ई. बद्दल माहिती दिली. त्यानंतर डॉ.महेश बुरांडे यांनी फार्मसी व्यवसायाची शपथ उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.किशोर एस.जैन यांचे मार्गदर्शन लाभले.