Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, कलात्मकतेस चालना देणारे व्यासपीठ; डॉ. बी. बी. वाफरे

शिक्षण विश्व: 'एमआयटी'मध्ये ॲनिमेशन डिझाइन लघु सेट्स स्पर्धा

पिंपरी- चिंचवड | ॲनिमेशन डिझाइन लघु सेट्स स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालचे संचालक डॉ. बी. बी. वाफरे यांनी व्यक्त केले. ॲनिमेशन डिझाइन लघु सेट्स स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेस चालना देणारा आणि त्यांच्यातील कल्पकतेला प्रोत्साहन देणारा एक आदर्श मंच असल्याचेही वाफरे म्हणाले.

एम. आय. टी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात “ॲनिमेशन डिझाइन लघु सेट्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉ.बोलत होते.संगणक विज्ञान शाळेच्या अधिष्ठाता प्रा. रश्मी लाड, उपसंचालिका प्रा. अक्षदा कुलकर्णी, आणि प्रा. मानसी अतिकार यावेळी उपस्थित होते.

Dr. B. B. Vafre said that the competition is an inspiring platform for students and promotes artistry.

हेही वाचा  :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष 

या मॉडेलच्या निर्मितीसाठी प्रा. निकिता देवरे, प्रा. प्रविन कार्ले, जयंत भुमकर, आणि महंत झडे. याचे मार्गदर्शक लाभले. विभाग प्रमुख प्रा. बरीन शेख यांनी स्पर्धाचे नेतृत्व केले . महाविद्यालचे संचालक डॉ. बी. बी. वाफरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि मेहनतीचे कौतुक करताना “ॲनिमेशन डिझाइन लघु सेट्स स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत व्यक्त केले. ॲनिमेशन डिझाइन लघु सेट्स स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेस चालना देणारा आणि त्यांच्यातील कल्पकतेला प्रोत्साहन देणारा एक आदर्श मंच ठरला आहे असे उद्गार काढले.

विद्यार्थ्यांना आपले कौशल्य-प्रतिभा सादरीकरणास व्यासपीठ..

एमआयटी महाविद्यालयाच्या माध्यमातून भरवण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये डिझाइन, अनालिटिक्स, आणि सायबर सुरक्षा विभागाने ॲनिमेशन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपले कौशल्य आणि प्रतिभा सादर करण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ॲनिमेशन प्रकल्प ,विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पाच लघु सेट्स हे त्यांच्या ॲनिमेशन डिझाइन आणि कहाणी सांगण्याच्या कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरले. हे सेट्स लोकप्रिय चित्रपट आणि कहाण्यांच्या प्रेरणेने विकसित करण्यात आले होते. गेम ऑफ थ्रोन्स, स्पेसशिप, जंगल बुक, ग्रीन स्क्रीन स्टुडिओ, हॉन्टेड हाऊस असे धडकी भरवणारे वातावरण निर्माण करणारे सेट विद्यार्थ्यांनी तयार केले होते. कार्यक्रमातील सर्वात विशेष आकर्षण उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे जुने संसद भवनाचे अत्यंत बारकाईने तयार केलेले मॉडेल, ज्याने उपस्थितांच्या कौतुकाची दाद मिळवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button