बीआरटी मार्गिकेतून खाजगी वाहने चालवू नका, ‘पीएमपीएमएल’चे आवाहन
![Don't drive private vehicles through BRT lanes, PMPML appeals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/BRT-Dapodi-1.jpg)
पिंपरी चिंचवड | बीआरटी मार्गिकेत खाजगी वाहने व पीएमपीएमएल बसमध्ये अपघातांच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. मात्र, तरीही खाजगी वाहने पीएमपीएमएल’च्या बीआरटी मार्गिकेतून जाऊन धोका पत्करतात. बीआरटी मार्गिकेत होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी बीआरटी मार्गिकेतून खाजगी वाहने चालवू नये, असे आवाहन पीएमपीएमएलने खाजगी वाहनचालकांना केले आहे.इच्छित स्थळी लवकर पोहोचण्याची घाईकरून अपघाताला आमंत्रण देण्यापेक्षा बीआरटी मार्गिकेत खाजगी वाहने घालू नयेत, असे आवाहन पीएमपीएमएल सर्व खाजगी वाहनचालकांना केले आहे. बीआरटी मार्गिकेतून खाजगी वाहन चालविल्यास पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडून दंडात्मक कारवाई होते. हि कारवाई टाळण्यासाठी बीआरटी मार्गिकेतून खाजगी वाहने चालवू नयेत.
वाहन चालविताना केलेल्या क्षुल्लक चुकीमुळे अपघात होऊन वाहन चालकाला कधी गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागते तर कधी प्राणास मुकावे लागते. अपघातामध्ये फक्त त्या वाहन चालकाचेच नुकसान होत नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला ते नुकसान सोसावे लागते. त्यामुळे खाजगी वाहनचालकांनी बीआरटी मार्गिकेतून खाजगी वाहने चालवू नयेत, असे आवाहन पीएमपीएमएलने केले आहे.