Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वकृत्त्व स्पर्धेत दिशा पवार प्रथम

  • अमृता विद्यालयात स्पर्धा : लहान गटात मारली बाजी

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या 29 ऑगस्ट जन्मदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय खेळ (क्रीडा) दिवस साजरा करण्यात येतो. याच क्रीडा दिवसाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर जिल्हा “क्रीडा भारती” व निगडी लायन्स क्लब यांच्या वतीने ५ ते ७ वी वयोगटातील वकृत्व स्पर्धेत अमृता विद्यालयाची विद्यार्थिनी दिशा पवार हिला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.

ही स्पर्धा निगडी येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे संपन्न झाली. या स्पर्धेत सिटी प्राइड स्कूल, अमृता विद्यालय, एस.एन.बी.पी स्कूल, उर्सुला स्कूल, सेंट अन्स जोसेफ स्कूल, मॉडर्न स्कूल यासह अनेक शिक्षण संस्थामधील मुलांमुलीनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते ९ वी असे दोन गटात विभाग करून वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ८० ते ९५ मुलामुलींनी सहभाग घेतला होता. दोन्ही गटात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक बक्षीस काढण्यात आली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button