breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडी परिसरात दिनेश यादव यांच्या पुढाकाराने कोविड लसीकरणाला वेग; कामगार, जेष्ठ नागरिक, महिलांचा उस्फुर्त सहभाग

पिंपरी – चिखलीतील कुदळवाडी भागात स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्या पुढाकाराने कामगार, जेष्ठ नागरिक, महिलांसाठी मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे.या मोहिमेचा शुभारंभ पालिकेच्या आकुर्डी रुग्णालयाच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिता साळवी, डॉ.राहुल साळुंखे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. १८ वर्षांवरील तब्बल ३३० लाभार्थ्यांना पहिल्याच दिवशी कोविशिल्डचा डोस देण्यात आला.

कुदळवाडीसह चिखली प्रभाग लसीकरणात शहरात आघाडीवर आहे. जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. परिसरातील लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड दाखवून मोठ्या संख्येने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन दिनेश यादव यांनी केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button