Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी, यमुनानगरमध्ये विकास कामांचा धडाका

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार : परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ

पिंपरी । प्रतिनिधी

निगडी, यमुनानगर, ओटास्कीम परिसरात विकास कामांचा धडाका सुरू आहे. अंतर्गत रस्त्यावर डांबरीकरणासह विविध विकास कामे केल्यानंतर आता ब्लॉक, पत्राशेड बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने सदर कामे मार्गी लावण्यात येत आहेत.

निगडी गावठाण, यमुनानगर, ओटास्कीम हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. या भागात मोठी लोकसंख्या आहे. या भागातील अंतर्गत रस्ते सुस्थितीत केले आहेत. त्यानंतर परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ क्रीडा समितीचे माजी सभापती, माजी नगरसेवक प्रा.उत्तम केंदळे, माजी नगरसेविका कमल घोलप, सामाजिक कार्यकर्ते बापू घोलप, दीपक मोढवे-पाटील, कुंदन लांडगे, स्वप्नील वाघमारे, दीपक नायर, राहुल मागाडे, प्रबुद्ध कांबळे, अक्षय उदगिरे, प्रशांत बाराते यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

हेही वाचा    –      नोएल टाटा टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष, नोएल टाटा कोण आहेत?

मिलिंदनगर येथील विश्वरत्न बुद्ध विहार, पंचशील बुद्धविहार, तथागत हौसिंग सोसायटी अंकुश चौक येथे ब्लॉक आणि शेड, भिमाईनगर, गणेश मंदिर येथे पत्राशेड बसविणे, यमुनानगर येथील साईबाबा मंदिर येथे फरशी, भिंत बसविणे, रुनाल फोलोरास येथे ब्लॉक बसविणे, दत्त मंदिर, संजयनगर येथे पत्राशेड, सावित्रीबाई फुले विहार येथे पेंटींग, खिडक्या, स्वच्छतागृह, जेतवन बौद्धविहार येथे साहित्य ठेवण्यासाठी खोली, स्वच्छतागृह, विश्वशांती बुद्ध विहार येथे पत्राशेड, पंचशील बुद्धविहार येथे स्वच्छतागृह, तारेचे कुंपण, तक्षशिल विहार येथे फरशी, खिडकी, वॉटर पृफिंग, श्रावस्ती विहार येथे गेट, खिडक्या, स्वच्छतागृह, साहित्य ठेवण्यासाठी खोली, तथागत विहार येथे पत्राशेड व फरशी बसविणे, मारुती मंदिर येथे कळसाचे काम करणे आणि बालाजी मंदिर येथील पेंटींग कामाला सुरुवात झाली आहे.

प्रभाग क्रमांक-13 निगडी, यमुनानगर परिसरातील विकास कामांसाठी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून भरघोस निधी मिळाला. प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. शिल्लक राहिलेल्या कामांचाही आज शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

– प्रा. उत्तम केंदळे, माजी नगरसेवक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button