ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देहू ते पंढरपूर २०२४ मोफत वैद्यकीय सेवा उपक्रम प्रस्थान सोहळा उत्साहात

वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

पिंपरी : वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टच्या वतीने पंढरपूर येथील २०२४ आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मोफत वैद्यकीय सेवेसाठी निगडी प्राधिकरण येथील संत तुकाराम उद्यानामधून वैद्यकीय पथक, डॉक्टर व रुग्णवाहिका यांचा प्रस्थान सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र कांकरिया सी.ए.ओ. प्रतिभा ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट तसेच सन्माननीय अतिथी मा. उपमहापौर शैलजाताई मोरे, मा. नगरसेवक जयंत (आप्पा) बागल व संजय दुर्गुळे डॉ. बबनराव राऊत, सुर्यकांत मुथियान, मिलिंद देशमुख, आदींच्या हस्ते रुग्णवाहिकांचे पूजन केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त श्रीराम नलावडे, प्रकाश सातव व सर्व स्वयंसेवक यांनी केले. सदर उपक्रमाद्वारे वारकऱ्यांना देहू ते पंढरपूर वारी दरम्यान २४ तास मोफत वैद्यकीय सेवा दिली असल्याची माहिती वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टतर्फे देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button