Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी महापाैरांकडून दिली जीवे मारण्याची धमकी

  • पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिली तक्रार

पिंपरी |महाईन्यूज|

‘मीच तुझा कार्यक्रम करेन’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी महापाैर तथा विद्यमान नगरसेवक असलेले योगेश बहल यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार शाम अभिमन्यू घोडके यांनी दिली आहे.

याबाबत पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे की, गुरुवार (दि. 25 फेब्रुवारी) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास महापालिकेचे नगरसेवक योगेश मंगलसेन बहल यांनी मला मोबाईलवरुन फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे बहल यांच्यापासून मला व परिवाराला जीवितहानीचा धोका निर्माण झालेला आहे.

सदरील नगरसेवक हे पैशाच्या जोरावर कोणत्याही थराला जाऊन त्रास देवू शकते. माझा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असल्याने सतत बाहेर जावे लागते. भविष्यात मला व माझ्या कुटूंबातील व्यक्तीस शारीरिक इजा झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधित बहल जबाबदार असतील. माझ्या तक्रारीचा योग्य विचार करुन दखल घ्यावी, अशी मागणी शाम अभिमन्यू घोडके यांनी केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button