ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोर येथे आढळलेल्या दुर्मिळ रंगदोष मयूरनक्षी कासवाची अमेरिकन जर्नल मध्ये नोंद!

पर्यावरण विश्व: भारतातून पहिली नोंद,शोधनिबंध प्रसिद्ध

पिंपरी : जनजागृती, दस्तावेजीकरण, संशोधन अश्या विविध प्रकारे निसर्ग संवर्धन क्षेत्रात कार्यरत अलाईव्ह संस्थेचे अध्यक्ष व वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला यांचा रंगदोष असलेले मयूरनक्षी कासव (लीथ’स सॉफ्टशेल टर्टल) विषयी शोधनिबंध ‘रेप्टाईल्स ऍन्ड एम्फिबियन्स या अमेरिकन विज्ञानपत्रिकेत 2 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाला आहे. सतत अडीच वर्षाच्या संशोधना नंतर हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

भोर येथील ग्रामस्थ प्रमोद थोरवे आणि सर्पमित्र शुभम पांडे यांनी 2 जुलै 2022 रोजी एक कासव रेस्क्यू केले होते. कासवाला कोणतीही इजा नव्हती. संपूर्ण ढालीवर पिवळसर झाक अधिक असलेल्या कासवाला तपासणी नंतर आवश्यक असल्यास उपचारासाठी त्याला कात्रजच्या प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्राकडे सुपुर्द करण्यात आले होते. सदर रेस्क्यू बद्दल वनविभागाला जाण करण्यात आली. त्या कासवाचे फोटो वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला यांना ओळख आणि पुढील संशोधनासाठी पाठवण्यात आले होते. याच जातीच्या सामान्य कासवाची ओळख सहज होते. परंतु हे कासव रंगदोषसह असल्याने अभ्यासाने ते ‘मयूरनक्षी कासव’ असल्याची ओळख उमेश वाघेला यांनी केली. हे गोड्या पाण्यातले कासव भारतीय उपखंडात नदी आणि तलावात आढळते. हे मिश्राहारी असून डासांच्या अळ्या, गोगलगाई, खेकडे, मासे आणि पाणवनस्पती यांचे अन्न आहे.

हेही वाचा –  एआयच्या सहाय्याने पुणे जिल्ह्याचा आता ‘समग्र पर्यटन आराखडा’

वन्यजीव अभ्यासक व अलाईव्हचे अध्यक्ष उमेश वाघेला म्हणाले, “हे गोड्या पाण्यातील मयूरनक्षी कासव (लीथ’स सॉफ्टशेल टर्टल) असून त्याच्या पाठीवर मोराच्या पिसांसारखे किमान चार निशाण असतात, त्यामुळे मयूरनक्षी कासव देण्यात आले आहे. इंग्रजीत ‘लीथ’स सॉफ्टशेल टर्टल’ तसेच ‘नागपूर सॉफ्टशेल टर्टल’ सुद्धा म्हणतात. हे ‘कलर ऍबरंट(रंगद्रव्यदोष) असल्यामुळे कासवाची ओळख पटवणे थोडे अवघड असते. रंग द्रव्याच्या कमतरतेमुळे सजीवांची त्वचा दोषपूर्ण रंगाची होते. कुठे एकदम फिकट पिवळसर तर कुठे गडद रंग असतात. याला ‘कलर ऍबरेशन’ असे म्हणतात. ही रंगदोष अणुवांशिकता, एखाद्या आजार, जणुकिय बदल तसेच खात असलेल्या अन्नदोषांमुळे सुद्धा येऊ शकते. वन्यजीवांच्या अनेक प्रजाती मधे एखादा रंगद्रव्यदोष असलेला जीव क्वचित आढळतो. मयूरनक्षी कासवांमध्ये रंग दोष आढळल्याची भारतातली ही पहिलीच घटना असून या विषयी अमेरिकन विज्ञानपत्रिकेत शोधनिबंध नुकताच प्रकाशित झाला आहे.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

सर्व कासवाची संख्या कमी होत असून आययुसीएन द्वारे याला अतिसंकटग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. सर्व जातीची कासवे जलसृष्टीचक्राचे महत्वाचे घटक आहेत. मृत व आजारी जलचर खाऊन हे पाणी शुद्ध ठेवण्यास कासव मोठी भूमिका बजावतात. यांना वाचवण्याची आवश्यकता आहे.

उमेश वाघेला
वन्यजीव अभ्यासक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button