# CORONAVIRUS: तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून जंतुनाशकांची फवारणी, रस्तेही धुतले!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1-27.jpg)
तळेगाव । महाईन्यूज ।प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून ‘कोरोना’ विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जंतुनाशकांची फवारणी आणि रस्ते धुऊन काढण्यात आले. तर नगरपरिषद प्रशासकीय कामकाजात फक्त ५ टक्के कर्मचारीच पुढील आदेश मिळेपर्यंत कामावर येतील, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी ‘महाईन्यूज’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, राजेंद्र चौक, गणपती चौक, शाळा चौक, बाजार पेठेतील प्रमुख रस्ते तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अग्निशमन बंबामधील पाण्यात जंतुनाशके टाकून त्यांची सर्व ठिकाणी फवारणी करण्यात आली. तसेच इतर भागात जंतुनाशक पावडर टाकून धुरळणी करण्यात आली.
यावेळी पाहणी करण्यासाठी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, सभागृहनेते अमोल शेटे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, शोभा भेगडे, आशुतोष हेंद्रे, सचिन जाधव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर सह व्यापारी वर्ग उपस्थित होता.