पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात कोरोना वाढतोय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/pimpri-chinchwad-police.jpg)
– 9 अधिकारी आणि 21 कर्मचारी आहेत कोरोना पॉझिटिव्ह
पिंपरी l प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात 15 मे 2020 रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा 962 जणांना कोरोनाची लागण झाली. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. शहरातील 30 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात 9 अधिकारी आणि 21 कर्मचारी आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातही कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. अवघ्या दोन दिवसात पोलीस दलातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे.
पहिल्या लाटेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी कोरोनाला दूर ठेवले, मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाचा शहर पोलीस दलात कहर झाला. 345 अधिकारी आणि 2930 कर्मचारी असे एकूण तीन हजार 375 एवढे पिंपरी चिंचवड पोलिसांचे मनुष्यबळ आहे. त्यातील तब्बल 28 टक्के पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला.