विधायक : पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली कृतज्ञता
![Constructor: Expressed gratitude to the police by tying rakhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-20-at-13.20.45.jpeg)
- इंद्रायणीनगर येथील निलम लांडगे यांचा पुढाकार
- अमराई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पोलिसांना सलाम
पिंपरी । प्रतिनिधी
समाजातील प्रत्येक घटकाच्या रक्षणासाठी चोवीस तास कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी पोलिसांच्या हातावर राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
भोसरी, एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये हा कार्यक्रम पार पडला. निलम शिवराज लांडगे व आमराई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने पोलिस बांधवांना त्यांच्या कार्या प्रती सलाम करण्यासाठी सर्व पोलिस बांधवांना औक्षण करीत महिला भगिनी वर्गाने राख्या बांधल्या.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षा पुजा अल्हाट, चिटणीस मुक्ता गोसावी, वंदना नारखेडे, व पांचाळ ताई उपस्थित होत्या.
रक्षण करण्याची मागितली ओवाळणी…
पोलिस बांधव चोवीस तास समाजाचे रक्षण करतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी बांधण्याची संकल्पना मनात आली. आमच्या भगिनींनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरविली. राखी बांधल्यावर आमचे रक्षण करावे, अशी ओवाळणी मागितली, अशी भावना निलम शिवराज लांडगे यांनी व्यक्त केली.