विधायक उपक्रम: दिघी-बोपखेलवासीयांसाठी ‘आपुलकीची दिवाळी’
![constructive-activities-apulki-chi-diwali-for-dighi-bopkhel-residents](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Ghule-780x470.jpeg)
हिरानानी घुले, चेतन घुले यांनी जपला माणुसकीचा वसा
सुमारे २० हजार नागरिकांना दिवाळी भेट
पिंपरी : सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी. यासह दिवाळीत आपुलकी आणि माणुसकी जपावी, असा संदेश देत दिघी आणि बोपखेल परिसरातील नागरिकांना यावर्षीसुद्धा दिवाळी किट भेट दिले. परिसरात या ‘आपुलकीच्या दिवाळी भेट’ ची चर्चा रंगली आहे.
माजी उपमहापौर हिरानानी घुले आणि माजी शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले यांच्या पुढाकाराने गेल्या सात वर्षांपासून दिघी आणि बोपखेल परिसरातील नागरिकांना दिवाळी किट भेट देण्याचा उपक्रम राबवला जातो. यावर्षी सुमारे २० हजार किट वाटप करण्यात आले.
विशेष म्हणजे, हिरानानी घुले आणि चेतन घुले प्रत्येक घरात स्वत: भेट देतात आणि दीपावलीच्या शुभेच्छा देतात. यासह परिसरातील नागरिकांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे विचारपूस केली जाते.
दिवाळी किटच्या माध्यमातून पणती, रांगोळी, रांगोळीचे छाप, उंबरा पट्टी यासह गोडधोड असे पॅकेट तयार तयार केले जाते. त्यामुळे नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छांसह अत्यावश्यक वस्तुंची भेट दिली जाते. सर्वसामान्य नागरिकांडून या उपक्रमाचे कौतूक होते आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Ghule-1-1024x768.jpeg)
शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले म्हणाले की, गोरगरिब, कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांच्या घरात दिवाळी साजरी व्हावी. त्यासाठी खारीचा वाटा म्हणून मदत व्हावी. यासह लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होता यावे, यासाठी हा उपक्रम घेतला जातो. अबालवृद्धांचा सहभाग असतो. लोकांशी संवाद होतो. दिघी आणि बोपखेलमधील नागरिक म्हणून एक परिवार आहे. परिवारातील सदस्याप्रमाणे काम करायला आवडते. यापुढील काळात हा उपक्रम निरंतर सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Ghule-2-1024x768.jpeg)