Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये शालेय निवडणूकांची रंगतदार पर्वणी

विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाही प्रक्रिया, नव्या नेतृत्वाची निवड

पिंपरी | व्ही. के. माटे हायस्कूल, चिंचवड येथे मंगळवार, दिनांक १ जुलै रोजी शालेय कुलप्रमुख आणि मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने निवडणूक व मतदानाची प्रक्रिया समजावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या निवडणुकीसाठी लाल, निळा, पिवळा आणि हिरवा अशा चार कुलांची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक कुलासाठी प्रमुख पदासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले. शाळेच्या प्राचार्य सौ. इंद्रायणी माटे पिसोळकर मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. दिलीप कुमावत, पर्यवेक्षिका सौ. मैत्रेयी राजे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. तर निवडणूक विभाग प्रमुख सौ. हौशा परिहारिया यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे संयोजन केले.

प्रत्येक उमेदवाराला खडू, फळा, वही, पेन अशी चिन्हे देण्यात आली होती. मतदानासाठी बॅलेट पेपर छापून देण्यात आले, मतदान केंद्र उभारण्यात आले, व विविध मतदान अधिकारी नेमण्यात आले होते. संपूर्ण शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने ही निवडणूक पार पडली.

हेही वाचा       :      अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:

लाल कुल: शौर्य शितोळे
निळा कुल: ईशान सूर्यवंशी
पिवळा कुल: श्रीतेजा पांचाळ
हिरवा कुल: श्रेयश खोत

याशिवाय शाळेच्या शालाधिपतीपदी प्रेम खरबड यांची आणि उपशालाधिपतीपदी आदिती इगावे यांची निवड झाली. शाळेच्या प्राचार्य मॅडम, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षिका व सर्व शिक्षकांनी विजयी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शालेय निवडणूक अनुभवातून विद्यार्थ्यांना नेतृत्व, जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांची जाणीव झाली असल्याचे प्राचार्य मॅडम यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button