अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांकडून 280 रक्त पिशव्यांचे संकलन!
शिक्षण विश्व: जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pune-13-2-780x470.jpg)
पिंपरी- चिंचवड : जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग मध्ये रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने 280 रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याची माहिती संस्थेच्या संचालिका डॉ कमलजीत कौर यांनी दिली.
लोहगाव येथील अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग राष्ट्रीय छात्र सेना विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अक्षय ब्लड बँक हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा – एआयच्या सहाय्याने पुणे जिल्ह्याचा आता ‘समग्र पर्यटन आराखडा’
यावेळी महाविद्यालय प्राचार्य डॉ एफ बी सय्यद, डॉ एस एम खैरनार, डॉ राहुल बचुटे, डॉ पंकज आगरकर, डॉ भाग्यश्री ढाकुलकर, निवृत्त लेफ्टनंट कर्नल संजय करोडपती, प्रा.रोहित गरड, डॉ सानिया अन्सारी, डॉ नागेश शेळके आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शिबिरात निशुल्क रक्तगट तपासणी करण्यात आली. रक्तदान शिबिरास अक्षय ब्लड बँक हडपसर यांचे सहकार्य लाभले . राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट प्रा. अनिकेत नेमाडे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिलीप बाळासाहेब घुले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.