Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वच्छतेचा जागर करत आयुक्त ‘ऑन फील्ड’!

पिंपरी मंडई परिसरात स्वच्छता मोहीम; ७६२ किलो कचरा संकलीत

पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत पिंपरीत आज भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पिंपरी मंडई परिसरात झालेल्या या मोहिमेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह सहभागी झाले होते.

या मोहिमेत तब्बल ३५० हून अधिक नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेत उत्साहाने सहभाग नोंदविला. नागरिकांशी संवाद साधताना आयुक्त शेखर सिंह यांनी “स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देशात सातवे तर महाराष्ट्रात पहिले स्थान मिळवले आहे. आगामी सर्वेक्षणात देशात अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी आपण सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, यासाठी महानगरपालिका पूर्णपणे कटिबद्ध आहे.”असे सांगितले.

स्वच्छतेच्या मोहिमेदरम्यान आयुक्त शेखर सिंह यांनी सफाई सेवक महिला, व्यापारी आणि नागरिकांशी देखील संवाद साधला. सफाई सेवकांमुळे पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ राहत असून,सफाई सेवकांचे योगदान बहुमोल आहे.

हेही वाचा        :          बंगालच्या उपसागरामुळे महाराष्ट्रात हाय अलर्ट; आजपासून 3 दिवस अतिवृष्टीचा धोका

यावेळी बोलताना आरोग्य विभाग प्रमुख उप आयुक्त सचिन पवार म्हणाले शहर स्वच्छतेची आपली सामूहिक जबाबदारी असून, स्वच्छता सेवकांच्या मेहनतीला समाजाने योग्य आदर दिला पाहिजे,नागरिकांनीही स्वच्छतेच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग प्रमुख, उप आयुक्त सचिन पवार, अ क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, कुंडलिक दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक दत्तात्रय गणगे, आरोग्य निरीक्षक विकास शिंदे उपस्थित होते.

या मोहीमेची सुरुवात शगुन चौकातून झाली. त्यानंतर डिलक्स चौक, पिंपरी कॅम्प, रेल्वे स्टेशन आणि साई चौक या भागात स्वच्छता उपक्रम पार पडला. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोहिमेला चालना दिली. यावेळी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच आरोग्य विभाग आणि ओंजळ संस्थेच्या सहकार्याने व्यापाऱ्यांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button