ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभाग ८ इंद्रायणी प्रभागात विलास मडेगिरी यांच्यावर नागरिकांचा विश्वास कायम

मिशन- PCMC : महापालिका निवडणूक प्रचाराला वेग

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ इंद्रायणी नगर–गवळी माता परिसरात भाजपचे उमेदवार विलास मडेगिरी यांनी प्रचाराला वेग दिला आहे. खंडेवस्ती परिसरात नागरिकांची घरोघरी भेट घेत आशीर्वाद घेतले असता, नागरिकांनी ठिकठिकाणी औक्षण करून मडेगिरी यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले.

मागील १९ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत असलेल्या विलास मडेगिरी यांनी स्थानिक प्रश्नांना सातत्याने न्याय देत अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज आणि नागरी सुविधांसाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा –  महापालिका निवडणूक प्रचारासाठी चौक व कोपरा सभांचे शुल्क निश्चित

मडेगिरी यांच्या कार्यालयातून २४ बाय ७ नागरिकांशी संपर्क ठेवला जातो. कोणतीही अडचण असो किंवा समस्या, तात्काळ दखल घेतली जाते, हीच त्यांची ओळख बनली आहे. विशेष म्हणजे परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये अडीचशेहून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचेही नागरिक आवर्जून सांगतात.

सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात मायेचा हात देत काम करणाऱ्या विलास मडेगिरी यांना याच कामाची पोचपावती म्हणून नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. “काम करणाऱ्या माणसालाच पुन्हा संधी द्यावी” अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे. हा नागरिकांचा विश्वास आगामी महापालिका निवडणुकीत विलास मडेगिरी यांना निश्चितच मोठा फायदा करून देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button