विकासाच्या मुद्यांवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचा प्रचाराचा धडाका!
मिशन- PCMC : सुरेश म्हेत्रे यांच्या नेतृत्त्वात प्रभागात पॅनेलची महाविजयासाठी ‘वज्रमूठ’

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 1 चिखलीमध्ये प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांच्या नेतृत्त्वात प्रभागातील भाजपाच्या पॅनेलने विकासाच्या मुद्यांवर महाविजयाची वज्रमूठ बांधली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, दि. 16 जानेवारी रोजी निकाल घोषित होणार आहे. महापालिका प्रभाग क्रं. 1 मध्ये म्हणजे चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती भाग, सोनवणे वस्ती इत्यादी., ऐश्वर्यम कोर्टयार्ड, शाईन सिटी परिसराचा समावेश आहे.
हेही वाचा – प्रभाग ८ इंद्रायणी प्रभागात विलास मडेगिरी यांच्यावर नागरिकांचा विश्वास कायम

भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार सुरेश म्हेत्रे, सोनम मोरे, गणेश मळेकर आणि शितल यादव यांनी गणेश मंदिर, दत्त मंदिर आणि चिखलीतील ग्रामदैवताचे आशिर्वाद घेतले आणि प्रचाराचा शुभरंभ केला. आमदार महेश लांडगे यांचे बंधू तथा कामगार नेते सचिन लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. परिसरातील वातावरण अगदी भगवामय झाले होते.
उमेदवार सुरेश म्हेत्रे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात चिखलीसह समाविष्ट गावांमध्ये विकासाला चालना देण्यात आली. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि आमदार लांडगे यांना या प्रभातील लोकांनी मताधिक्य दिले आहे. आता महापालिका निवडणुकीत आम्ही विकासाच्या मुद्यांवर आणि देव-देश-धर्म संस्कृती संवर्धनाचा संकल्प घेवून लोकांच्या समोर आहोत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील महाविजयाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“चिखलीसह प्रभाग क्रमांक 1 मधील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाला पात्र ठरेल असे पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख काम करण्याचा आमचा निर्धार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षिततेसह सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देव-देश-धर्म आणि संस्कृती जपत प्रभागाचा सर्वांगीण विकास घडविणे हेच आमचे ध्येय आहे.”
– सुरेश म्हेत्रे, उमेदवार, भाजपा, प्रभाग क्रमांक- 1, चिखली.




