TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवड

चिंचवडगाव येथे विविध सामाजिक स्तुत्य उपक्रमांद्वारे नववर्षाचे जल्लोषात स्वागत

चिंचवडः श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवार व समस्त चिंचवडकर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘३१ डिसेंबरच्या रात्री रात्री ९ ते १२ या वेळेत ‘रक्तदान शिबिराचे आयोजन, कोजागिरी पौर्णिमेसारखे मसाला दूध वाटप, स्वातंत्र्य दिना सारखी जिलबी आणि रात्री बारा वाजता श्री गणेश आरती आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची ‘शिववंदना’ त्याचबरोबर रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे निर्मित सावरकर घराण्यातील सदस्यांच्या सामाजिक व वैयक्तिक कार्याची माहिती देणारी ‘यज्ञकुंड दिनदर्शिका २०२३’ भेट देण्यात आली आगळावेगळा उपक्रम चिंचवडगावातील क्रांतीवीर चापेकर पुतळ्याशेजारी हुतात्मा चापेकर मनपा शाळेत करून एक अनोख्या पद्धतीने ‘२०२३’ या इंग्रजी नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.

यावेळी १२२३ पेक्षा रक्तदात्यांनी रक्तदान केले. नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, डॉ.अविनाश वैद्य, डॉ. मनाली वैद्य, आशाताई पात्रुडकर, श्रीनिवास कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. तर प्रा. सुनिल खर्डे सर, दत्ताभाऊ चिंचवडे, सुभाष मालुसरे, दिनेश कानेटकर, अजित कुलथे, स्वप्निल जोशी, आशुतोष जाधव, भास्कर भोर, राहुलदादा खोले, अविनाश आगज्ञान, अतुल मुनोत, अशोक सैनी, सिद्धेश्वर लाड, प्रशांत आगज्ञान, शुभम पोरे, युवराज वाघ, सारिका, कांचन, शुभांगी, संदीप पांगुळ, चेतन भंगाळे, दिव्या आदि प्रमुख कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

सदर उपक्रमास अतीशय चांगला व उस्फुर्त प्रतिसाद चिंचवडकरांनी दिला व दरवर्षी म्हणजे प्रत्येक ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत याच पद्धतीने करण्याचा संकल्पही यावेळी उपस्थितींनी केला. सर्व साधारणपणे ३१ डिसेंबर ही रात्र अतिशय वाईट पद्धतीने साजरी करण्याचा पायंडा, प्रघात पडला आहे दारू/मद्य प्राशन, पार्टी, दोन चाकी चार चाकी वाहने वेगात वेडीवाकडी चालविणे, कर्णकर्कश हॉर्न, वाहतुकीचे नियम मोडण्यातील धन्यता, चौका चौकात पोलिस यंत्रणेवर ताण, आवाज मर्यादेचे उल्लंघन, आपली भारतीय संस्कृती पायदळी तुडविणे, आचकट विचकट नाच गाणी.. सुजाण माणसाचा श्वासचं गुदमरतो, यावर आळा बसणे आवश्यक असल्याचा सूर उपस्थितांकडून आळवण्यात आला.

यावर चांगला पर्याय म्हणून चिंचवडमधे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणारे ‘रक्तदूत’ डॉ. अविनाश वैद्य व त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉ. मनाली वैद्य, त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी आणि नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी चिंचवडगावात प्रथमच हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button