TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणे

चिंचवड पोटनिवडणूकः दिवंगत आमदार जगताप कुटुंब ‘अभेद्य’

  • मतभेद नाही : बिनविरोध नसेल, तर लढाईची तयारी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मात्र, पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरुन जगताप कुटुंबात दोन गट असल्याचा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. यामध्ये सत्यता नाही, जगताप कुटुंब ‘अभेद्य’ आहे, असे सुतोवाच जगताप घराण्यातील निकटवर्तीयांनी केले आहे. चिंचवड पोटनिवडणूक उमेदवारीवरुन जगताप कुटुंबातील कुणाला भाजपाची उमेदवारी मिळणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांच्यात उमेदवारीबाबत मतभेद आहेत, असा दावा केला जात आहे.

मात्र, चार दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या पोटनिवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीला आश्विनी जगताप आणि शंकर जगताप दोघेही उपस्थित होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी शंकर जगताप सामोरे गेले.
कोणत्याही परिस्थिती लक्ष्मण जगताप यांनी ज्याप्रमाणे भाजपाशी पक्षनिष्ठा कायम ठेवली. आजारी असतानाताही रुग्णवाहिकेतून मुंबईला प्रवास केला. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केले. तसाच पक्षनिष्ठेचा वारसा आम्ही कुटुंबीय पुढे चालवणार आहोत, असे जाहीरपणे शंकर जगताप यांनी सांगितले.

जगतापांचे राजकीय उत्तराधिकारी शंकर जगतापच…
लक्ष्मण जगताप यांचे निधन होवून आज २६ दिवस झाले. अद्याप जगताप कुटुंबीय आणि समर्थक या दु:खातून सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीत अनपेक्षीतपणे पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीतील उमेदवारीवरुन जगताप यांचे राजकीय वारसदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला. मात्र, दोन वर्षांपूर्वीच लक्ष्मण जगताप यांनी आपला राजकीय उत्तराधिकारी अप्रत्यक्षपणे घोषीत केला होता. चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रभारीपदी शंकर जगताप यांनी नियुक्ती दिवंगत आमदार जगताप यांच्या सूचनेनुसारच केली होती. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मतदार संघ पिंजून काढला. भाजपाच्या सर्व बैठका आणि सभा, समारंभ, कार्यक्रमांमध्ये शंकर जगताप यांचा सहभाग हा ‘नेक्ट टू एमएलए जगताप’ असाच राहिला आहे. जगताप यांना आश्विनी जगताप यांना राजकीय धुरा सोपवायची असती, तर त्यांनी दोन वर्षांपूर्वीच त्यांना मतदार संघामध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली असती, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीकडून चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील तीव्र इच्छुकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होवू नये, या करिता जगताप घराण्यातील उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकीटवर लढवावा, यासाठी राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांचा एक गट कार्यरत झाला आहे. पण, २०१४ पासून पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे वर्चस्व ठेवण्यासाठी दिवंगत जगताप यांनी राष्ट्रवादीशी संघर्ष केला. मग, त्यांच्या घराण्यातील कोणीही उमेवार राष्ट्रवादीच्या उमेदवारी घेईल का? हा खरा प्रश्न आहे. मात्र, शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास, आगामी १५ वर्षे संभाव्य प्रतिस्पर्धींना संधी मिळणार नाही. त्यामुळे राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी जगताप घराण्यात फूट पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. परंतु, जगताप घराण्यातील परस्पर समंजसपणा पाहता कुटंबातील एकोपा कायम आहे, असेच अधोरेखित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button