Chinchwad: दुचाकीस्वारांनी महिलांच्या गळ्यातील एक लाखांचे मंगळसूत्र हिसकावले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/CHAIN-SNACHING_01.jpg)
चिंचवड परिसरात दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. श्रीधरनगर व गांधीपेठेत ही चोरी झाली. चोरटयांनी एक लाखांचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे.
श्रीधरनगर, चिंचवड येथील पहिल्या घटनेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. 27 ऑक्टोंबर रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी 12 ग्रॅम वजनाचे 55 हजार रूपयांचे मंगळसूत्र चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मंगळसुत्र चोरीची दुसरी घटना 20 ऑक्टोबर रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास गांधीपेठ, चिंचवड येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या सासूला कामावर सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी 12 ग्रॅम वजानाचे 55 हजार रूपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव करत आहेत.