Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

येमेनच्या सात नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस

पुणे :  कोंढव्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या येमेन देशातील सात नागरिकांची हकालपट्टी करण्यात येणार आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे. पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाने (एफआरओ) ही कारवाई करण्यात आली.

शहरात शिक्षण, व्यवसाय, तसेच उपचारांसाठी मोठ्या संख्येने परदेशातील नागरिक वास्तव्यास येतात. काही परदेशी नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतर बेकायदा वास्तव्य करतात.

हेही वाचा –  हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसकडून जिल्हा परिषद शाळेस डिजिटल स्मार्टबोर्ड

अशा नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच दिले. त्यानंतर ही तपासणी सुरू करण्यात आली. कोंढव्यातील “एनआयबीएम’ रस्त्यावरील एका सोसायटीत वास्तव्यास असलेल्या दोन महिलांसह सात येमेनी नागरिकांची व्हिसाची मुदत संपल्याचे लक्षात आले.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना देश सोडून जाण्याची नोटीस (लिव्ह इंडिया नोटीस) बजाविली असून, त्यांची लवकरच हक्कालपट्टी केली जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button